Don Abu Salem : डॉनला तुरुंगात भेटायला आलेली ‘वो कौन थी?’

223
प्रेयसीच्या भेटीसाठी Gangster Abu Salem आतूर, तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी टाडा न्यायालयाकडे केला अर्ज
  • प्रतिनिधी 

९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात डॉन अबू सालेम (Don Abu Salem) हा बाईच्या प्रकरणात पुन्हा चर्चेत आला आहे. नाशिकच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या कुख्यात अबू सालेमला भेटण्यासाठी नाशिकच्या तुरुंगात गुरुवारी आलेल्या एक महिलेवरून अबू सालेम हा पुन्हा एकदा चर्चेत आला. वो कौन थी? अशी चर्चा सुरू असताना मुंबई एटीएसच्या पथकाने या महिलेला एका परदेशी नागरिकासह चौकशीकामी ताब्यात घेतले होते. विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही महिला अबू सालेमची एक्स गर्लफ्रेंड असून ती अबू सालेमकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आली होती अशी माहिती समोर येत आहे.

कुख्यात डॉन अबू सालेम (Don Abu Salem) हा आपल्या गुन्हेगारी कृत्यांपेक्षा प्रेम प्रकरणांमुळे सर्वांत जास्त चर्चेत आला आहे. अबू सालेमला सर्वांत जास्त प्रसिद्धी मिळवून देणारी चित्रपट अभिनेत्री मोनिका बेदी सोबत त्याचे नाव जोडले गेले होते. या दोघांच्या प्रेमकथा वृत्तपत्राने रंगून रंगून लिहल्या होत्या. दाऊद टोळीशी संलग्न असणारा कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला मुंबईत झालेल्या ९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अटक करण्यात आली आहे. अबू सालेम हा सध्या नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे.

(हेही वाचा – Marigold Price : फुलांचा दरवळ महागला ; दसऱ्यानिमित्त प्रतिकिलो झेंडूने गाठली शंभरी)

यापूर्वी तो आर्थर रोड तुरुंगात होता, आर्थर रोड तुरुंगात इतर टोळ्यांचे गँगस्टर असल्यामुळे सुरक्षेच्या कारणाने त्याला तळोजा तुरुंगात हलविण्यात आले होते. तळोजा तुरुंगात असताना अबू सालेमचे (Don Abu Salem) आणखी एक प्रेमप्रकरण समोर आले होते. २०१४ मध्ये मुंब्रा येथे राहणारी एक तरुणी अबू सालेमच्या प्रेमात पडली, आणि या दोघांनी एका काझीच्या मदतीने निकाह करून चालत्या ट्रेनमध्ये त्यांचे मिलन केले होते आणि ते अधिकृतपणे लग्न करण्याचाही प्रयत्न करत होत. परंतु तुरुंग अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने नकार दिल्याने ते निष्पन्न झाले नाही. कुटुंबातील जवळच्या सूत्रांचा दावा आहे की, तिने अधिकृतपणे सालेमशी लग्न केले नव्हते. २०१६ मध्ये या दोघांचे ट्रेन मधील एकत्रित असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. जानेवारी २०२४ मध्ये अबू सालेमच्या या प्रेयसीने त्याला सोडून मुंब्रा येथे एका व्यावसायिकासोबत निकाह केला, या निकाहनंतर जानेवारीमध्ये अबू सालेमच्या प्रेमाची चर्चा रंगली होती.

तब्बल आठ महिन्यांनी अबू सालेम (Don Abu Salem) हा पुन्हा एकदा चर्चेत आला. गुरुवारी दिनांक १० ऑक्टोबर रोजी अबू सालेमला नाशिकच्या तुरुंगात भेटण्यासाठी एक महिला आणि एक परदेशी व्यक्ती आली होती. सालेमला भेटण्यासाठी आलेल्या महिला आणि परदेशी नागरिकाची दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी चौकशी केली. या भेटीच्या उद्देशाबाबत पोलीस चौकशी करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सालेमला भेटण्यासाठी एक महिला आणि एक परदेशी तुरुंगात आले होते. या भेटीची माहिती एटीएसला मिळाली आणि एटीएसने या दोघांकडे तब्बल पाच तास चौकशी केली. चौकशीदरम्यान, महिलेने पोलिसांना दावा केला आहे की तिने सालेमला भेटण्यासाठी आवश्यक ती परवानगी घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला (Don Abu Salem) भेट देणारी महिला त्याची एक्स गर्लफ्रेंड असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे प्रेमसंबंध १५ ते २० वर्षांपूर्वीचे आहेत. अबू सालेमने याआधी तिच्याशी लग्न करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला होता, पण त्याची विनंती फेटाळण्यात आली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.