‘डिजिटल अरेस्ट’ Cyber Crime चा नवा फंडा, काय आहे डिजिटल अरेस्ट जाणून घ्या…

189
Digital Arrest Scam ला ८५ वर्षीय महिला पडली बळी
एखाद्या संशयितावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात होती, एका ठिकाणी त्या व्यक्तीला नजरकैदेत ठेवले जात होते, त्याला ‘हाऊसअरेस्ट’ असे म्हटले जात होते. सध्याच्या डिझिटल युगात व्हिडीओ कॉल करून ‘डिझिटल अरेस्ट’ नावाखाली तासनतास त्या व्यक्तीला घरात बंदी करून अखेर तडजोडीच्या नावाखाली सायबर गुन्हेगाराकडून त्या व्यक्तिकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार देशात मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. मुंबईसह देशातील काही राज्यामध्ये ‘डिझिटल अरेस्ट’ नावाखाली अनेकांची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  (Cyber Crime)
भारतात मागील काही वर्षापासून सायबर गुन्ह्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.कोरोना काळात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ होऊन ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सायबर गुन्हेगाराकडून प्रत्येक वेळी फसवणूक करण्यासाठी नवीन नवीन शक्कल लढवली जात आहे. सध्या सायबर गुन्हेगाराकडून लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी सेक्सट्रोशन, कुरियर पार्सल हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. (Cyber Crime)
 व्हिडीओ कॉल करून समोरून एक महिला पुरुषासोबत मैत्री करते, त्यानंतर अश्लील चॅटिंग करून ती महिला स्वतःच्या अंगावरील एकएक वस्त्र काढुन समोरच्या व्यक्तीला देखील कपडे काढण्यास सांगून त्या व्यक्तीचा व्हिडीओ  रेकॉर्ड करून त्या व्हिडीओच्या आधारे समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून लाखो रुपयांची ऑनलाईन मोठी रक्कम उकळून सेक्सटोर्शन केले जाते.  (Cyber Crime)
तसेच दिल्ली विमानतळावर तैवान येथून तुमच्या नावाने एक पार्सल आले असून त्या पार्सल मध्ये तुमचे आधारकार्ड  मिळून आले आहे, त्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळून आले असल्याचा कॉल करून कस्टम, सीबीआय, डीआयआर, ईडी , नार्कोटिक्स ब्युरो मधून बोलत असल्याचे सांगून समोरच्या व्यक्तीला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ऑनलाईन रक्कम उकळण्यात येत आहे.  (Cyber Crime)
सायबर गुन्हेगारांनी आता डिझिटल अरेस्टच्या नावाखाली लूट सुरू केली आहे.डिजिटल अरेस्टच्या नुकत्याच नोंदवलेल्या एका प्रकरणात, नोएडामधील ४० वर्षीय महिला डॉक्टरने सायबर ६० लाख गमावले आहे, डॉक्टरला एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला, कॉल करणाऱ्या व्यक्तीने दूरसंचार अधिकारी असल्याचे सांगून तीचे  नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात गुंतल्याचे सांगितले. नंतर हा फोन मुंबईतील टिळक नगर पोलीस ठाण्यातील एका कथित पोलीस अधिकाऱ्याला हस्तांतरित करण्यात आला. “अधिकाऱ्याने” पीडितेला सांगितले की तिच्या विरोधात अश्लील व्हिडिओ शेअर केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. तिचे नाव जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जोडले गेले होते आणि तिच्या विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला होता, असा दावाही गुन्हेगारांनी केला. या धमक्यांनंतर, पीडितेला डिजिटल अटकेत ठेवण्यात आले होते, तर घोटाळेबाजांनी तिचे तपशील मागितले होते आणि १५ ते १६  जुलै दरम्यान तिच्या बँक खात्यातून पैसे उकळण्यात आले.  (Cyber Crime)
दुसऱ्या एका प्रकरणात, हैदराबादच्या रहिवाशाने ३०  दिवसात १.२ कोटी रुपये गमावले आणि एका बनावट अधिकाऱ्याचा असाच कॉल आला ज्याने त्याला सांगितले की त्याचे नाव अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडलेले आहे. कथित पोलीस अधिकाऱ्याने पीडितेला त्याची वैयक्तिक माहिती कोणतीही चूक न करता शेअर करण्याची सूचना केली आणि त्याला २४ तास व्हिडीओवर ऑनलाइन राहण्यास सांगितले, आम्ही तुम्हाला डिझिटल अरेस्ट करीत आहोत असे सांगून ऑनलाईन रक्कम उकळण्यात आली. (Cyber Crime)
डिजिटल अरेस्ट फसवणुकीची नेमके काय होते? 
“कुरिअर पार्सल घोटाळा” अशा घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी किंवा नियामक प्राधिकरणाची तोतयागिरी करतात आणि फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे व्यक्तीशी संपर्क साधतात. त्यांचा दावा आहे की पीडितेची गंभीर गुन्ह्यांसाठी चौकशी सुरू आहे, अनेकदा आरोप करतात की बेकायदेशीर वस्तू असलेले संशयास्पद पार्सल पीडितेशी संबंधित केले गेले आहे. स्वतःला अधिकारी दाखविण्यासाठी सायबर गुन्हेगाराकडून बनावट ओळखपत्र,  बॅज किंवा संदर्भ क्रमांक असलेले पत्र  व्हाट्सअँप वर पाठवले जातात,त्यानंतर अटकेची भीती दाखवून पीडित व्यक्ती दंड भरून  अटक किंवा इतर कायदेशीर परिणाम टाळू शकते. पीडितेला “तपास शुल्क” किंवा “जामीन” च्या नावाखाली पैसे एका विशिष्ट खात्यात हस्तांतरित करण्याची सूचना दिली जाते. (Cyber Crime)
जर पीडित व्यक्तीने विरोध केल्यास त्यांना आणखी घाबरवले जाते, तात्काळ अटक यासारख्या गंभीर परिणामांची धमकी देतात. (Cyber Crime)
या प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे….
  1. सायबर फसवणुकीच्या घटनेत  तुम्ही सुरक्षित कसे राहाल? दक्षता महत्त्वाची आहे.तुम्हाला असा कॉल आल्यास, कोणताही तपशील शेअर करण्यापूर्वी कॉल करणाऱ्याची ओळख पटवून घ्या.
  2. फोनवर वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका जोपर्यंत तुम्हाला कॉलरच्या ओळखीची खात्री नसेल.
  3. अधिकृत अधिकारी फोनवर संवेदनशील माहिती विचारणार नाहीत हे लक्षात असू द्या.
  4. तुम्हाला संशयास्पद कॉल आल्यास, तत्काळ पोलिस आणि तुमच्या बँकेत तक्रार करा.हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.