Cyber ​​Crime : ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘शेअर्स ट्रेडिंग’ सायबर फसवणुकीचे केंद्रबिंदू दुबई व्हाया चीन

60
Chembur मध्ये डिजिटल अरेस्ट मध्ये १२ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक
Chembur मध्ये डिजिटल अरेस्ट मध्ये १२ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक
  • प्रतिनिधी

‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘शेअर्स ड्रेडिंग’ सायबर गुन्ह्यांचे केंद्रबिंदू दुबई व्हाया चीन देशात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने ११ कोटींच्या सायबर फसवणुकीत डोंगरी परिसरातून नुकतीच अटक करण्यात आलेल्या कैफ मन्सुरी यांच्या चौकशीत त्याने हा खुलासा केला आहे. त्याने मुंबईत उघडून दिलेल्या बँक खात्यावर जमा होणारी रक्कम दुबई येथून काढून ती चीन मधील सायबर माफियांना वळती केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई सायबर पोलिसांकडून या अनुषंगाने तपास सुरु असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. ११ कोटींच्या शेअर्स ट्रेंडिंग फसवणूक आणि ज्येष्ठ नागरिक डिजिटल कोठडी प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने अनेक बँक खाती गोठवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Cyber ​​Crime)

‘डिजिटल अरेस्ट’ आणि ‘शेअर्स ट्रेंडिंग’ सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील काही महिन्यांपासून मोठी वाढ झाली आहे. मागील दोन आठवड्यात एकट्या मुंबई शहरात डिजिटल अरेस्ट आणि शेअर्स ट्रेडिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये अनेकांनी कोट्यवधी रुपये गमावले आहे. दक्षिण मुंबईतील एका सेवानिवृत्त कॅप्टनची शेअर्स ट्रेडिंगमध्ये सायबर माफियांनी ११ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केली. तर एका ज्येष्ठ नागरिक महिलेला महिनाभर डिजिटल कोठडीत ठेवून तिच्या खात्यातून ३ कोटी ८० लाख रुपये वळते करण्यात आले होते. या पाठोपाठ एका आयआयटीच्या विद्यार्थिनीला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तिची ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील काही महिन्यात भयंकर वाढ झालेली असून या सायबर माफियांच्या निशाण्यावर सेवानिवृत्त नागरिक, उच्च घराण्यातील ज्येष्ठ नागरिक, बड्या कंपन्यांचे अधिकारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. (Cyber ​​Crime)

(हेही वाचा – Maharashtra Politics : मंत्रिपदासाठी सर्वपक्षीय जोरदार फिल्डिंग; ‘हे’ आहेत मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरे)

मुंबईतील कुलाबा येथे राहणारे सेवानिवृत्त कॅप्टन यांना सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत सायबर माफियांनी शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली त्यांची तब्बल ११ कोटी १६ लाखांची फसवणूक केली होती. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सायबर गुन्हे शाखा आणि दक्षिण सायबर पोलिस ठाण्याने तात्काळ ज्या खात्यावर रकमा जमा करण्यात आल्या त्या खातेदारांची माहिती काढली आता बहुतांश खाते हे मुंबईतील बँकामध्ये असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी या प्रकरणी डोंगरी येथून कैफ मन्सुरी याला अटक करून त्याच्याजवळून ३३ डेबिट कार्ड्स आणि १२ धनादेश पुस्तिका जप्त करण्यात आल्या होत्या. कैफ हा पूर्वी बँकेत कामाला होता. त्यामुळे त्याला बँक खाते उघडण्याची माहिती होती, त्याने मुंबईतील गरीब आणि गरजवंतांना १० टक्के कमिशनची लालच दाखवून त्यांच्या नावावर वेगवेगेळ्या बँकामध्ये खाते उघडून त्या खात्याची सविस्तर माहिती दुबई येथे बसलेल्या सायबर माफियांना दिली होती. दुबईतील सायबर माफियांनी ही माहिती चीन तैवान येथे बसलेल्या सायबर माफियांना पुरवली होती. (Cyber ​​Crime)

दुबई आणि चीन येथून या खात्यामध्ये जमा झालेल्या फसवणुकीतील रकमा नेटबँकिंग तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून काढल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच कैफ याने देखील त्याच्या कमिशनचे पैसे धनादेशाच्या माध्यमातून काढल्याचे समोर आले आहे. कैफ मन्सुरी हा दुबईत बसलेल्या सायबर माफियांच्या संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे. दुबईत बसलेल्या सायबर माफियांनी कैफ प्रमाणेच मुंबई, ठाणे नवी मुंबईतील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून गाठून त्यांना पैशांचे लालच देऊन बँक खाते उघडून देण्याचे काम दिल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. पोलीस या अनुषंगाने तपास करीत असून दुबईत बसलेल्या तसेच सायबर माफिया तसेच यांच्या संपर्कात असलेल्या चीन तैवान मधील सायबर माफियांची माहिती काढून तपास करीत आहेत. (Cyber ​​Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.