Crime : गिरगावात भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

180
Crime : गिरगावात भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

संशयाने पछाडलेल्या पतीने भररस्त्यात पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून स्वतःच्या हातची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (५ ऑगस्ट) सकाळी गिरगाव येथे घडली. या घटनेत दोघांचे प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेप्रकरणी व्ही.पी. रोड पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)

सागर भोसले (३२) आणि शीतल भोसले (३०) असे या दाम्पत्याचे नावे आहेत. सागर हा ठाण्यात राहण्यास आहे तर शीतल ही माहेरी नालासोपारा येथे मागील काही दिवसापासून राहण्यास आहे. शीतल ही गिरगाव खाडीलकर रोड येथे एका पत्रिकेच्या दुकानात नोकरी करते, तर सागर हा खाजगी कंपनीत नोकरीला आहे. सागर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे दोघांत होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून शीतल ही माहेरी नालासोपारा येथे राहण्यास आली होती. (Crime)

(हेही वाचा – लोकसभेतील पराभवानंतर Ajit Pawar बारामतीत; कार्यकर्त्यांना म्हणाले, सगळ्यांनी राजीनामा द्यावेत)

शीतल ही नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी गिरगाव येथे कामावर जात असताना संशयाने पछाडलेल्या सागर हा तिचा पाठलाग करत गिरगाव येथे आला. व त्याने भररस्त्यात शितलवर धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, दरम्यान स्थानिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता सागर ने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी दाखल झालेल्या व्ही.पी. रोड पोलिसांनी शीतल आणि सागरला उपचारासाठी गोकुलदास तेजपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी व्ही.पी. रोड पोलिसांनी सागर भोसले विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.