Crime News : भांडुप येथील खाजगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग; लिफ्ट मेकॅनिकला अटक

196
Crime News : भांडुप येथील खाजगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग; लिफ्ट मेकॅनिकला अटक
Crime News : भांडुप येथील खाजगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग; लिफ्ट मेकॅनिकला अटक
बदलापूरच्या घटनेनंतर मुंबईतील भांडुप येथील एका खाजगी इंटरनॅशनल शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने भांडुप हादरले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.भांडुप पोलिसांनी २७ वर्षीय लिफ्ट मेकॅनिकला अटक केली आहे. (Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भांडुप पश्चिम  येथील एका खाजगी इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या ५ वी आणि ६ वी इयत्तेत शिकणाऱ्या  तीन विद्यार्थीनीचा लिफ्ट दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या मेकॅनिक ने शाळेच्या लिफ्ट जवळ विनयभंग केला, एका विद्यार्थीनीच्या पाठीवर हात फिरवून इतर दोन विद्यार्थीकडे बघून अश्लील हावभाव केल्याची तक्रार  विद्यार्थीनीने शाळेच्या शिक्षकाकडे केली होती. २७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेची  शाळेच्या प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन शाळेने तात्काळ या घटनेची माहिती भांडुप पोलिसांना दिली. (Crime News)
भांडुप पोलिसांनी पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून लिफ्ट मेकॅनिक गोपाळ गौडा (२७) याला अटक करण्यात आल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिली आहे. (Crime News)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.