Crime News: बदलापुरनंतर आता पुण्यात शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न!

247
Crime News: बदलापुरनंतर आता पुण्यात शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न!
Crime News: बदलापुरनंतर आता पुण्यात शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न!

कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येनंतर (Crime News) आता बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला. अशातच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील (Pune) एका नामांकित शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.

(हेही वाचा –विधानसभा निवडणुकीत Congress ‘या’ पाच आमदारांचा पत्ता करणार कट)

भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १५ ऑगस्टच्या दिवशी घडली. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात शिकत आहे. तर अत्याचार करणारा आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. आरोपी विद्यार्थ्याचे वय १९ असून त्याचे नाव देवराज पदम आग्री असे आहे. या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. १५ ऑगस्ट रोजी शाळेतील स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडला. समर्थ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध ७४,७५ (१) (i) पोक्सो ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

(हेही वाचा –Badlapur घटनेतील आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

नेमकं काय घडलं?
पिडीत मुलगी १५ ऑगस्टच्या दिवशी शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ उभा होता. त्याने पीडित मुलगी जवळ येताच तिचा जबरदस्तीने हात पकडला. तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत नेले. यावेळी आरोपीने तरुणाने तिच्याशी अश्लील कृत्य करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला. पीडित अल्पवयीन मुलीने आपली कशीबशी सुटका करीत तेथून पळ काढला. घरी केल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली. समर्थ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. याप्रकरणाचा पूढील तपास उपनिरीक्षक माने करीत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.