Crime News : जुहूमध्ये चोर समजून अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून काढली धिंड 

189
Crime News : चर्चगेटमधून चोरलेल्या १ वर्षाच्या मुलीची राजस्थानमध्ये सुटका; महिलेला अटक
Crime News : चर्चगेटमधून चोरलेल्या १ वर्षाच्या मुलीची राजस्थानमध्ये सुटका; महिलेला अटक
जुहूमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे, गरीब घरातील दोन अल्पवयीन मुलांना चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने विवस्त्र करून मारहाण केली, त्यानंतर त्यांना साखळदंडाने बांधून त्यांची परिसरात धिंड काढून त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Crime News)
विलेपार्ले पश्चिम जुहू येथील नेहरू नगर झोपडपट्टी येथे राहणारे १४ आणि १७ वर्षाचे पीडित मुले आजोबासह राहण्यास आहे. पीडित मुलांचे आजोबा कचरा वेचून स्वतःचे आणि नातवांचा उदरनिर्वाह करतात. रविवारी रात्री पीडित दोन्ही भाऊ परिसरात फिरत असताना काही चार ते पाच जणांच्या जमावाने त्यांना चोर असल्याच्या संशयावरून पकडून त्यांना मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्यांना विवस्त्र केले, त्यानंतर त्यांचे मुंडन करून त्यांना साखळदंडाने बांधून लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांची परिसरातून धिंड काढण्यात आली. (Crime News)
या सर्व घटनेचा व्हिडीओ काढण्यात आला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. सोमवारी हा व्हिडीओ पीडित मुलांच्या आजोबांनी बघितला असता त्यांनी मुलांना बोलावून चौकशी केली असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला.आजोबांनी या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी चार पुरुष आणि दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Crime News)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.