Crime News: मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी! ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त

76
Crime News: मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी! ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त
Crime News: मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी! ३.१२ कोटी रुपयांचा माल जप्त

मुंबईत सोने आणि हिऱ्यांची तस्करी (Crime News) करणारी बातमी समोर आली आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री मुंबई कस्टमने (Mumbai Customs) दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 2.286 किलो सोने आणि हिरे जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे 1.58 कोटी रुपये (सोन्याचे मूल्य) आणि 1.54 कोटी रुपये हिऱ्यांची किंमत आहे. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. (Gold and Diamonds Smuggling )

दुबईहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशाकडे सोने
पहिल्या प्रकरणात, दुबईहून मुंबईत येणाऱ्या एका संशयीत प्रवाशाला थांबवण्यात आले आणि त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यात 24 कॅरेट सोन्याचे 12 बार (एकूण वजन 1400 ग्रॅम), अंदाजे किंमत 97,00,236 रुपये आहे. हे सोने प्रवाशाने पॅन्टच्या बेल्टजवळ लपवले होते. चौकशीदरम्यान प्रवाशाने सांगितले की, हे कृत्य त्याच फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून केले आहे. सहप्रवाशानेही आपल्या निवेदनात हे मान्य केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. (Crime News)

हाँगकाँगहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवशाकडे सोन्यासह हिरे
दुसऱ्या प्रकरणात, हाँगकाँगहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवाशाला थांबवून त्याच्याकडून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये दोन 24 कॅरेट सोन्याच्या बांगड्या (एकूण वजन 886 ग्रॅम, किमतीचे 61,38,864 रुपये), रोलेक्स घड्याळ (13,70,520 रुपये किमतीचे) होते. तर 1,54,18,575 रुपये किमतीचे हिरे जप्त करण्यात आले. सोने, रोलेक्स घड्याळ प्रवाशाने परिधान केले होते, तर हिरे प्रवाशाने परिधान केलेल्या बनियानच्या आत एका विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवले होते. याप्रकरणी त्या प्रवाशाला अटकही करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास सुरू केला आहे. (Crime News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.