Crime News : दाट धुक्याने घेतला तरूणाचा जीव; तब्बल १५०० फूट खोल दरीत पडून मृत्यू

169
Crime News : दाट धुक्याने घेतला तरूणाचा जीव; तब्बल १५०० फूट खोल दरीत पडून मृत्यू
Crime News : दाट धुक्याने घेतला तरूणाचा जीव; तब्बल १५०० फूट खोल दरीत पडून मृत्यू

तोरणमाळ येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा तब्बल 1500 फूट खोल दरीत पडून मृत्यू (Crime News) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. पाय घसरून तोल गेल्याने मृत तरुण दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा –Navi Mumbai Crime : नवी मुंबईच्या सिवूडमध्ये तरुणीची हत्या करून मृतदेह तलावात फेकला)

चार ऑगस्ट रोजी तोरणमाळ येथे काही तरूण पर्यटनासाठी आले होते. याच तरुणांत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोर पाणी येथील भरत पावरा (Bharat Pawara) याचाही समावेश होता. हा तरुण आपल्या मित्रांसोबत प्रसिद्ध असलेल्या सीताखाई धबधब्याचा परिसरात गेले होते. पण यावेळी त्याचे मित्र पुढे निघून गेले. या परिसरात दाट धुके होते. त्यामुळे भरत पावरा हा मागे राहिल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले नाही. सायंकाळी घरी जात असताना भरत नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक गावकरी आणि नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. (Crime News)

(हेही वाचा –Chhatrapati Sambhajinagar येथे तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिले भाजपा आमदारावर केले आरोप)

सलग दोन दिवस परिसरात त्याच्या शोध घेण्यात आला. मात्र त्याचा शोध न लागल्याने म्हसावद पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर खोल दरीत एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर दरीत आढळलेला मृतदेह हा बेपत्ता भरत याचाच असल्याचे पोलिसांना समजले. पाय घसरून खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.