Chhatrapati Sambhaji Nagar Accident : मद्यधुंद तरुणांच्या गाडीची धडक, बाळासह चौघांचा मृत्यू

165
Chhatrapati Sambhaji Nagar Accident : मद्यधुंद तरुणांच्या गाडीची धडक, बाळासह चौघांचा मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar Accident : मद्यधुंद तरुणांच्या गाडीची धडक, बाळासह चौघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये १० वर्षांनंतर झालेल्या बाळाच्या बारशातून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या दोन तरुणांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई, बाळ, आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (Chhatrapati Sambhaji Nagar Accident)

(हेही वाचा- Ban Ind vs Ban Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या वार्तांकनावर बंदीचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा निर्णय )

ही दुर्घटना वाळुज एमआयडीसी परिसरातील नगर रोडवर घडली. दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणाऱ्या विशाल चव्हाण (Vishal Chavan) (२२) आणि कृष्णा केरे (१९) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar Accident)

राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, हे अपघात गंभीर स्वरूपाचे ठरत आहेत. या प्रकरणाने मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar Accident)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.