Chembur Sexual Assault : मुंबईत शाळकरी विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाकडून लैंगिक छळ

मुंबईतील चेंबूर परिसरात एका शाळकरी मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थीनेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे.

148
Chembur Sexual Assault : मुंबईत शाळकरी विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाकडून लैंगिक छळ
Chembur Sexual Assault : मुंबईत शाळकरी विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाकडून लैंगिक छळ

मुंबईतील चेंबूर परिसरात रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा लैंगिक छळ (Sexual harassment of school girl) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या चेंबूर पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध बीएनएस कलम आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. (Chembur Sexual Assault)

विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी रिक्षात बसली होती

चेंबूर पोलिसांकडून (Chembur Police) मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जुलै ते १३ सप्टेंबर दरम्यान घडली. पीडित अल्पवयीन मुलगी कुर्ला येथे कुटुंबासह राहते आणि चेंबूर येथील शाळेत शिकते. असे सांगण्यात येते. विद्यार्थिनीने शाळेत जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. मात्र तिला एकटी पाहिल्याचा फायदा घेत रिक्षा चालकाने तिला चेंबूर नाक्याजवळील निर्जन इमारतीत नेले असता, रिक्षा चालकाने विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केला.

(हेही वाचा – Photo Exhibition : मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढ्याच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन)

पोलीस आरोपीच्या शोधात

पीडित विद्यार्थिनीने विरोध केला. मात्र आरोपीने घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे पीडित विद्यार्थीनी प्रचंड घाबरली होती. जेव्हा पीडित विद्यार्थीनेच्या वागण्यातील बदल लक्षात आला असता, आईने ने तिला विश्वासात घेत विचारले आणि पीडितेने आईला संपूर्ण कथा सांगितली. यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या आईने जवळचे चेंबूर पोलीस ठाणे गाठून आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या आरोपी रिक्षाचालकाला अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. (Chembur Sexual Assault)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.