Bomb Threat : दिल्ली-लंडन विस्तारा विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; फ्रँकफर्टमध्ये आपत्कालीन लँडिंग

96
Bomb Threat : दिल्ली-लंडन विस्तारा विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; फ्रँकफर्टमध्ये आपत्कालीन लँडिंग
Bomb Threat : दिल्ली-लंडन विस्तारा विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; फ्रँकफर्टमध्ये आपत्कालीन लँडिंग

देशातील विमानांवर बॉम्ब ठेवण्याच्या धमक्यांची मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून थांबलेली नाही. शुक्रवारी (18 ऑक्टोबर) दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विस्तारा विमानाला (यू. के. 17) बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर फ्रँकफर्टकडे वळवण्यात आले. या विमानाचे फ्रँकफर्ट येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. शनिवारी सकाळी, विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की विमान फ्रँकफर्ट विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि आवश्यक तपासणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मंजुरी मिळाल्यानंतर हे विमान आपल्या गंतव्यस्थानासाठी उड्डाण करेल. (Bomb Threat)

(हेही वाचा- Ind vs NZ, 1st Test : जिगरबाज विराट कोहली आता सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत)

18 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विस्तारा विमान यूके 17 ला सोशल मीडियावर सुरक्षेची धमकी मिळाली होती. प्रोटोकॉलनुसार, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली आणि खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकांनी विमान फ्रँकफर्टकडे वळवण्याचा निर्णय घेतला.” (Bomb Threat)

  • नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

बॉम्बच्या बनावट धमक्यांच्या घटना रोखण्यासाठी उल्लंघन करणार्यांना नो-फ्लाय यादीत टाकण्यासह विमान कंपन्यांसाठी कठोर नियम आणण्याचा नागरी उड्डाण मंत्रालयाचा विचार आहे. नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांनी विमान उडवण्याच्या धमकीबद्दल चिंता व्यक्त केली. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. (Bomb Threat)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.