Bandra Worli Sea-Link वर BMW व Mercedes ची शर्यत! भीषण अपघातात टॅक्सी उलटली

184
Bandra Worli Sea-Link वर BMW व Mercedes ची शर्यत! भीषण अपघातात टॅक्सी उलटली
Bandra Worli Sea-Link वर BMW व Mercedes ची शर्यत! भीषण अपघातात टॅक्सी उलटली

मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवर (Bandra Worli Sea-Link) शर्यतीच्या नादात दोन आलिशान गाड्यांनी एका टॅक्सीला धडक दिली आहे. टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या कुटुंबातील चार सदस्य व टॅक्सीचालक जखमी झाला आहे. या अपघाताप्रकरणी दोन्ही आलिशान गाड्या चालवणाऱ्या इसमांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॅक्सीमधून लहान मुलासह एका कुटुंबातील चार सदस्य प्रवास करत होते. या अपघातात सुदैवाने त्यांचा जीव बचावला, मात्र ते गंभीर जखमी झाले आहेत.

(हेही वाचा-Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेनचं नाव बदलणार, काय आहे नवीन नाव?)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी आपसात शर्यत लावली होती. दोघेही वांद्रे-वरळी सागरी सेतूवर सुस्साट वेगाने कार चालवत होते. मात्र दोघांचंही कारवरील नियंत्रण सुटलं व त्यांनी त्याच पूलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला धडक दिली. दोन भरदाव गाड्यांच्या धडकेनंतर टॅक्सी उलटली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरळी पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांना अटक केली. त्यांच्यावर भरदाव वेगाने गाडी चालवणे, शर्यत लावल्याप्रकरणी आणि अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. (Bandra Worli Sea-Link)

नेमकं काय घडलं?
वांद्रे-वरळी सागरी सेतूवर बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. दोघेही वाऱ्याच्या वेगाने आपापल्या कार चालवत होते. काही अंतर पुढे गेल्यावर समोर एक टॅक्सी होती. त्याचवेळी या दोन्ही कारचालकांचं कारवरील नियंत्रण सुटलं. या दोन्ही आलिशान गाड्यांनी टॅक्सीला धडक दिली. कार पूलावरच उलटली. सुदैवानी टॅक्सीमधील प्रवासी वाचले. वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही गाड्या जप्त केल्या. तसेच मर्सिडीज व बीएमडब्ल्यू चालकांना अटक केली आहे. (Bandra Worli Sea-Link)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.