BBC : बीबीसीने कबुल केली 40 कोटींची करचुकवेगिरी

करचुकवेगिरीच्या आरोपांनंतर कंपनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करेल,असे आश्वासनही बीबीसीने दिले आहे.

87
BBC : बीबीसीने कबुल केली 40 कोटींची करचुकवेगिरी

ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) 2016 पासून कमी कर भरल्याचे मान्य केले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी बीबीसीच्या (BBC) कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली होती. यामध्ये कंपनीच्या मुंबई-दिल्ली कार्यालयांची तपासणी केल्यानंतर करचुकवेगिरीचे अनेक पुरावे देखील सापडले होते. यानंतर आता बीबीसीने कमी उत्पन्न दाखवून कर कमी भरल्याचे स्वतः मान्य केले आहे.

(हेही वाचा – इअरफोन वापरताय? तर करू नका ‘ही’ चूक, नाहीतर येईल कायमचे बहिरेपण)

यासंदर्भातील माहितीनुसार, बीबीसीने (BBC) 2016 ते 2022 दरम्यान 40 कोटी रुपये इतका कर कमी भरला. त्यामुळे 40 कोटी रुपयांचा कर जमा करण्यासाठी बीबीसीने अर्जही दाखल केला आहे. करचुकवेगिरीच्या आरोपांनंतर कंपनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करेल,असे आश्वासनही बीबीसीने दिले आहे.

बीबीसीच्या (BBC) कार्यालयांची पाहणी केली असता, आयकर विभागाने बीबीसीने दाखवलेले उत्पन्न भारतातील कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचे सांगितले होते. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बीबीसीविरोधात चौकशी सुरू केली. ईडी सध्या फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्टचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या आरोपांची चौकशी करत आहे. आयकर विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान बीबीसी ग्रुपने कमी उत्पन्न दाखवून कर वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने म्हटले की, सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, विविध भारतीय भाषांमध्ये (इंग्रजी व्यतिरिक्त) कंटेटचा पुरेसा वापर असूनही, समूहाने (BBC) दाखवलेले उत्पन्न किंवा नफा कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.