Baramati News: बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कोयत्याने वार करून हत्या; परिसरात खळबळ

224
Baramati News: बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कोयत्याने वार करून हत्या; परिसरात खळबळ
Baramati News: बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कोयत्याने वार करून हत्या; परिसरात खळबळ

बारामतीमध्ये (Baramati News) एक भयंकर घटना घडली आहे. बारामती शहरातील मध्यवर्ती तुळजाराम चतुरचंद (टी. सी) महाविद्यालयात १२ वीत शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर दोघांजणांनी चाकूने हल्ला करून खून केला आहे. ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजता घडली.

(हेही वाचा-Dharavi Masjid Demolition : धारावीतील अनधिकृत मशीद हटवण्याच्या कामाला सुरुवात)

महाविद्यालय सुरू असतानाच आवारात अल्पवयीन मुलाचा खून झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दूसरा आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थव पोळ (Arthva Pol) (वय १७) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अर्थव पोळ हा बारावीत शिकत होता. तुळजाराम चतुरचंद (टी. सी) महाविद्यालयात शिक्षण घेत होता. (Baramati News)

नेमकं काय घडलं?
कॉलेजच्या बाहेर आज सकाळी सर्व विद्यार्थी जमले होते. त्यावेळी अर्थव पोळ व त्याच्याच वर्गात शिकत असलेल्या काही तरुणांमध्ये वाद झाला. दोघेही हमरीतुमवरीवर आले. आरोपींनी अथर्व वर कोयत्याने वार केले. या घटनेत अथर्व गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपी पळून गेले. अर्थवला तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. (Baramati News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.