Crime : बांगलादेशी पॉर्न स्टार बन्ना शेखला बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी अटक

317
Crime : बांगलादेशी पॉर्न स्टार बन्ना शेखला बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी अटक
  • प्रतिनिधी 

बांगलादेशी पॉर्न स्टार आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखला बनावट पासपोर्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी पॉर्न स्टार आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखसह पाच जणांविरुद्ध बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट तयार करणे आणि भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या आरोही उर्फ बन्ना शेखच्या कुटुंबियांचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Crime)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील कल्याण नेवाळी परिसरात बांगलादेशी कुटुंब बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचा एक निनावी अर्ज हिल लाईन पोलीस ठाण्याला प्राप्त झाला होता. या अर्जाच्या अनुषंगाने तपास करून हिल लाईन पोलिसांनी नेवाळी परिसरातून संशयित म्हणून आरोही बेर्डे उर्फ बन्ना शेखला ताब्यात घेण्यात आले. बन्ना शेखकडे कागदपत्राची मागणी केली असता तिने पोलिसांना दिलेल्या पासपोर्टवर रिया अरविंद बेर्डे असे नाव होते. अधिक चौकशीत आरोही बेर्डे ही पॉर्न स्टार असून ती रिया ऐवजी आरोही आणि बन्ना शेखच्या नावाने ओळखली जाते. पोलिसांनी तिने भारतीय असल्याचे पुरावे पोलिसांना दिले आहे, ते बोगस कागदपत्रांच्या आधारावर बनविण्यात आले असल्याची माहिती समोर आली. (Crime)

(हेही वाचा – कसबा मतदारसंघातून भाजपाने Kunal Tilak यांना उमेदवारी देण्याची मागणी)

हिल लाईन पोलीस ठाण्यात आरोही बेर्डे उर्फ बन्ना शेख तिची आई अंजली राजाराम पाटील उर्फ ​​अंजली अरविंद बर्डे उर्फ ​​रुबी शेख, भाऊ रवींद्र अरविंद बर्डे उर्फ ​​रियाज शेख आणि अरविंद शामराव बर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद बर्डे हा भारतीय असून मूळचा अमरावती जिल्ह्यातील आहे. काही वर्षांपूर्वी अरविंद हा मुंबईत टॅक्सी चालवत असताना बेकायदेशीर भारतात आलेली अंजली उर्फ रुबी शेख (बन्ना शेखची आई) हिची ओळख अरविंद शेख सोबत झाली. (Crime)

अरविंद सोबत विवाह केला, त्यानंतर अरविंद बर्डेने तिला आणि तिच्या मुलांना स्वतःचे नाव दिले. या तिघांची बोगस कागदपत्रे बनवून त्यांचे पासपोर्ट काढण्यात आले. पॉर्न स्टार बन्ना शेखने दावा केला आहे की, अरविंद बर्डे हे तिचे वडील आहे, मात्र पोलिसांना तिच्या बोलवण्यावर विश्वास नाही. तिची आई, भाऊ आणि अरविंद बर्डे हे तिघे फरार असून ते कतार येथे असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार बन्ना शेख हिने कल्याण नेवाळीमध्ये नुकताच स्वतःचा फ्लॅट विकत घेतला आहे, आणि ती त्या ठिकाणी राहत होती, तिने अनेक पॉर्न चित्रपटात काम केले आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.