Badlapur Sexual Abuse Case: ‘त्या जखमा सायकल चालविल्याने झाल्या’, बदलापुरातील शाळा मुख्याध्यापिकेचा अजब दावा

249
Badlapur Sexual Abuse Case: 'त्या जखमा सायकल चालविल्याने झाल्या', बदलापुरातील शाळा मुख्याध्यापिकेचा अजब दावा
Badlapur Sexual Abuse Case: 'त्या जखमा सायकल चालविल्याने झाल्या', बदलापुरातील शाळा मुख्याध्यापिकेचा अजब दावा

बदलापुरातील (Badlapur Sexual Abuse Case) शाळेत (Adarsh ​​Vidya Mandir) शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या मुख्य आरोपी अटक केली होती. आता आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दम्यान, दोघींपैकी एकीच्या पालकांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

पोलिसांनीही पालकांना धमकाविले

पीडित बालिकेचा वैद्याकीय अहवाल घेऊन पालक शाळेत गेले असता ‘सायकल चालविताना दुखापत झाली असेल,’ असा संतापजनक दावा मुख्याध्यापकांनी केल्याचा गौप्यस्फोट पालकांनी केला. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीही धमकाविल्याचा आणि छळ केल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. (Badlapur Sexual Abuse Case)

 महिला पोलिसाने घेतली शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक

प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी एका महिला पोलिसाने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. १६ ऑगस्ट रोजी पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले. मात्र शाळेने सायकलमुळे जखम झाली असावी किंवा शाळेबाहेर काही घडले असावे, असे निरर्थक दावे करत अहवाल फेटाळून लावला. त्यानंतर पालक तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. साधी तक्रार दाखल करून घेण्यास १२ तास लावले. तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असा इशारा दिल्याचाही पालकांचा आरोप आहे. (Badlapur Sexual Abuse Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.