Crime News: बदलापूरात चिमुरडी पून्हा ठरली वासनेचा बळी! पित्यानेच केले पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

284
Crime Against Women: आजही राज्यात दररोज १२६ महिलांवर अत्याचार होतात; विरोधकांचा नवीन narrative
Crime Against Women: आजही राज्यात दररोज १२६ महिलांवर अत्याचार होतात; विरोधकांचा नवीन narrative

चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणामुळे (Crime News) बदलापुरात (Badlapur) संतापाचं वातावरण असतानाच आता बदलापूरमध्ये एका पित्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

(हेही वाचा –Army Truck Accident: लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळून भीषण अपघात, तीन जवान हुतात्मा, चार जखमी)

पीडित मुलगी आणि तिचं कुटुंब उत्तर प्रदेशमधील असून गेल्या काही वर्षांपासून बदलापुरात वास्तव्याला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. (Crime News)

(हेही वाचा –kolkata rape case: पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला! पोलिसांसह आंदोलक जखमी, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी)

टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 54 वर्षीय आरोपी त्याच्या 15 वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. या प्रकरणात बदलापूर पूर्व पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.