Badlapur abuse case प्रकरणी आरोपी अक्षयच्या आई-वडिलांचा दावा काय?

261
Badlapur abuse case प्रकरणी आरोपी अक्षयच्या आई-वडिलांचा दावा काय?
Badlapur abuse case प्रकरणी आरोपी अक्षयच्या आई-वडिलांचा दावा काय?

बदलापूर (Badlapur abuse case) येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती. या घटनेला चोवीस तास उलटताच आता अक्षय शिंदे (Akshay Shinde) निर्दोष असल्याचा दावा त्याच्या आई वडिलांनी केला आहे.

(हेही वाचा –…तोपर्यंत तुम्ही गांभीर्याने घेणारच नाही का? बलात्कार प्रकरणावरून Bombay High Court ची सरकारवर आगपाखड)

एबीपी माझाला फोनवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत अक्षय शिंदेचे आई-वडिल म्हणाले, “अक्षयला फक्त १५ दिवस झाले होते कामाला लागून. १७ तारखेला त्याला पोलिसांनी धरलं. अक्षयला धरुन नेलं इतकंच आम्हाला सांगण्यात आलं. पोलिसांनी अक्षयला मारहाण केली. माझ्या लहान मुलालाही पोलिसांनी मारलं. चौकीत गेल्यावर पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलाने चुकीचा प्रकार केला आहे. अक्षय फक्त ११ वाजता बाथरुम धुवायला जात होता. बाकी कुठलंही काम दिलेलं नव्हतं. त्यानंतर शाळेत झाडू मारायचा. संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटली की झाडू मारायला जायचो. आमचं सगळं कुटुंबच तिथे कामाला होतं.” (Badlapur abuse case)

(हेही वाचा –CM Eknath Shinde: आता ‘लाडका शेतकरी’ योजना आणणार)

“अक्षय डोक्याने थोडा अधू आहे. लहानपणी त्याला थोडं दुखणं होतं, डोक्याने थोडा कमजोर होता. त्याला औषधोपचार सुरु होते. अक्षयने हा काही प्रकार केलेला नाही. आमच्या घरात लोक शिरले, आम्हाला मारहाण करण्यात आली आणि घराबाहेर ढकलून दिलं. तुम्ही इथे राहूच नका असं आम्हाला सांगितलं. आमचं कुणी काही ऐकूनच घेतलं नाही.” असं अक्षयच्या आईने सांगितलं. (Badlapur abuse case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.