अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही; Justice Chandiwal यांचा खळबळजनक दावा

130
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही; Justice Chandiwal यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही; Justice Chandiwal यांचा खळबळजनक दावा

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना क्लीनचीट दिलेली नाही. मी माझ्या अहवालात क्लीनचीट हा शब्दच वापरला नाहीय. परमबीर सिंह यांनी जी माघार घेतली, त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली आहे. पण मी क्लिनचीट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही. अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाही. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असतं, असा गौप्यस्फोट न्यायमूर्ती चांदीवाल (Justice Chandiwal) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy 2024 : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात पहिला सराव, पर्थमधून पहिला व्हीडिओ )

गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Paramvir Singh) यांनी माझ्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. या संपूर्ण चौकशीनंतर आयोगाने दिलेल्या अहवालात मला क्लीन चिट देण्यात आली. मात्र राज्य सरकारने हा अहवाल मला क्लीनचिट मिळाल्यामुळे जाणीवपूर्वक दडवून ठेवला असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी वारंवार केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर चांदिवाल यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

चांदीवाल आयोगाने क्लीनचीट दिल्याचा अनिल देशमुखांचा दावा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Commission) यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही. योग्य पुरावे आयोगासमोर समोर येऊ दिले नाहीत, असे न्या. चांदीवाल यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही, असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतात. मात्र अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा न्या. चांदिवाल यांनी फेटाळला आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांची नावे घेतली

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत न्या. चांदिवाल यांनी म्हटले आहे की, सचिन वाझेने (Sachin Waze) दोन राजकीय व्यक्तिमत्वांची नावं घेतली होती. अजित पवार आणि शरद पवार यांची नावं वाझेंनी घेतली. मात्र ती नावे मी रेकॉर्डवर घेणार नाही, असे वाझेंना सांगितले. फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला. मात्र ते रेकॉर्डवर घेतले नाही. त्यातून प्रसिद्धी मिळते. मात्र ते मला होऊ द्यायचे नव्हते. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःच्या प्रसिद्धीचा मिळवायचा प्रयत्न दिसत होता, मात्र मी ते होऊ दिले नाही. सचिन वाझेने शपथपत्रात अजित पवार, शरद पवारांचे नाव घेतले. वाझे आणि अनिल देशमुखांनी फडणवीसांचे नावही गुंतवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं लक्षात येताच आम्ही हे रेकॉर्डवर घेतले नाही.

न्यायमूर्ती चांदिवाल (Justice Chandiwal) यांनी केलेले अन्य गौप्यस्फोट

1. देशमुख आणि वाझेकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न, शपथपत्रात वाझेनं अजित पवार, शरद पवारांची नाव घेतली. पण नाव घेणाऱ्यांचे मनसुबे ओळखून नाव रेकॉर्डवर घेतली नाहीत
2. चांदीवाल आयोगाच्या अहवालात क्लीनचिट असा शब्दप्रयोग नाही, उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत.
3. वाझे, परमबीर आणि देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यानंतर वाझेनं साक्ष फिरवली.
4. तेरी भी चूप मेरी भी चूप असं सगळं सुरू होतं. साक्षी पुराव्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न झाले
5. अहवालाच्या बाबी कोणत्याच सरकारच्या पचनी पडणार नाहीत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.