Akshay Shinde Encounter प्रकरणी कोर्टात काय युक्तिवाद झाला?

142
Akshay Shinde Encounter प्रकरणी कोर्टात काय युक्तिवाद झाला?
Akshay Shinde Encounter प्रकरणी कोर्टात काय युक्तिवाद झाला?

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी या एन्काउंटरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वकील अमित कटारनवरे यांनी अक्षयच्या वडिलांचं वकीलपत्र घेतलं आहे. हा एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) फेक असल्याचा आरोप अक्षयच्या वकिलांकडून केला जात आहे. या याचिकेवर आज, बुधवारी (२५ सप्टेंबर) पहिल्यांदा सुनावणी झाली. या सुनावणीत जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आदी पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चार पोलीस आसताना…
पोलीस वाहनातून आरोपीला घेऊन जात असताना चार पोलीस अधिकाऱ्यांची गरज काय होती? यासाठी अतिरिक्त माणसांचा वापर झाला असं वाटत नाही का? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. तसंच, त्याने हातातून पिस्तुल खेचून घेतली तेव्हा चार पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला रोखायला हवं होतं. चार पोलिसांना तो आवरता आला नाही का? असाही प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. (Akshay Shinde Encounter)

इतर दोन गोळ्या कुठे आहेत?
अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असं तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता अशा परिस्थितीत पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं. असं न्यायालयाने म्हटलं. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितलं की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली. (Akshay Shinde Encounter)

त्याने पिस्तुल लोड केली असं तुम्ही म्हणत असाल तर …
त्याने यापूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली असं तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील, असंही न्यायमूर्तींनी विचारलं. त्यावर सरकारी वकील म्हणाले, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत. (Akshay Shinde Encounter)

…पण त्याने पाणी मागितलं होतं
गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी विचारला. त्यावर सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितलं होतं. (Akshay Shinde Encounter)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.