मृत्यूनंतर बँकेतून २८ लाख गायब; तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करणा-या पोलिसांना न्यायालयाचा दणका

72

पियुष चंद्रमोहन शर्मा (२१) यांचा मृत्यू २१ सप्टेंबर २०२१ रोजी झाला. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून तब्बल २८ लाख ३१ हजार ६१० रक्कम रहस्यमय ट्रान्सफर झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पियुष शर्मा यांच्या बँक खात्याच्या नॉमिनी म्हणून उल्लेख असलेल्या पियुष यांच्या आई निर्मला शर्मा यांनी या प्रकरणी ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अखेर त्यांनी ठाणे न्यायालयात धाव घेतली, तेव्हा न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून २ आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला, अशी माहिती या प्रकरणातील वकील वैभव साटम यांनी दिली.

पियुष शर्मा यांचे दिल्ली येथे २१ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाले होते. पियुष यांचे ठाण्यातील कासारवडवली येथील आयसीआयसीआय बँकेत खाते होते. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी पियुष यांचे वडील चंद्रमोहन शर्मा बँकेत गेले, मात्र ते नॉमिनी नसल्याने त्यांना खात्यातील तपशील देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या आई निर्मला शर्मा यांनी बिहार येथील बँकेच्या शाखेतून खात्यातील तपशील घेतला असता पियुष यांच्या निधनांनंतर त्यांच्या बँकेतून महिनाभरात २८ लाख ३१ हजार ६१० रुपये काढून घेण्यात आले. कुमारी दास, कुमार दीपक, कुमार दी, कुमार दीप या नावावर ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर याप्रकरणी निर्मला शर्मा यांनी ठाणे कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी आधी टाळाटाळ केली. त्यामुळे अखेर शर्मा कुटुंबीयांनी ठाणे न्यायालयात धाव घेतली. स्थानिक न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला.

(हेही वाचा राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट सुरू आहे; जयंत पाटलांचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.