Adulteration : दिवाळीत सतर्क रहा; बोरिवलीत ३१ लाख रुपयांची भेसळयुक्त मिठाई जप्त

196
Adulteration : दिवाळीत सतर्क रहा; बोरिवलीत ३१ लाख रुपयांची भेसळयुक्त मिठाई जप्त
  • प्रतिनिधी 

पश्चिम उपनगरातील बोरिवलीमध्ये एका मिठाईच्या दुकानात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त (Adulteration) मिठाई मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी गुन्हे नियंत्रण पथक आणि एफडीएने केलेल्या कारवाईत बोरिवली पश्चिम येथील ‘माँ आशापुरा स्वीट मार्ट’ मधून ३१ लाख रुपयांची भेसळयुक्त मिठाई आणि सुकामेवा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकान मालकाला अटक करण्यात आली आहे. हिम्मतसिंग मोहनसिंग राजपूत असे अटक करण्यात आलेल्या दुकान मालकाचे नाव आहे.

(हेही वाचा – Hoax calls : विमानांना मिळत असलेल्या खोट्या धमक्यांच्या फोन कॉल्सवर काय आहेत उपाययोजना?)

दिवाळीच्या सणात मिठाईची मागणी असल्यामुळे मिठाई बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालात मोठ्या प्रमाणात भेसळ (Adulteration) केली जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि त्यांच्या पथकाने तसेच एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी बोरीवलीतील ‘माँ आशापुरा स्वीट मार्ट’ मध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणात सुकामेवा, मावा आणि मिठाई बनविण्यासाठी लागणारा कच्च्या माल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी ११२३ किलो काजू पावडर, ३८०९ किलो काजू, ३३६९ किलो काजू कतली आणि ५८ किलो तूप असा ३१ लाख ५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : उबाठा गटाला मोठा धक्का; ‘हा’ बंडखोर नेता सोमवारी भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज)

चौकशी दरम्यान हिम्मतलाल राजपूत हा मिठाई व्यावसायिक असून त्यानेच भेसळयुक्त मिठाई बनविण्यासाठी हुंडाई हॉल दहा दिवसांसाठी दोन लाखांच्या भाड्याने घेतला होता. या ठिकाणी तो त्याच्या कर्मचाऱ्यांसोबत अस्वच्छ पद्धतीने कुजलेले काजू, सुकामेवा आणि भेसळयुक्त (Adulteration) पदार्थ मिसळताना रंगेहाथ दिसून आला. त्यामुळे त्याला या अधिकाऱ्यांनी अटक करुन पुढील कारवाईसाठी एफडीए अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. घटनास्थळाहून जप्त केलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.