Accident : कुर्ला पूर्व येथे धावत्या डंपरच्या चाकाखाली येऊन आई आणि मुलाचा मृत्यू

285
Accident : कुर्ला पूर्व येथे धावत्या डंपरच्या चाकाखाली येऊन आई आणि मुलाचा मृत्यू
  • प्रतिनिधी

कुर्ला पूर्व नेहरू नगर येथे एका भीषण अपघातात आई आणि १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाला स्कुटीवरून शाळेत सोडण्यासाठी जात असताना स्कुटी स्लिप होऊन आई आणि मुलगा डंपरच्या चाकाखाली आले होते. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले होते त्या ठिकाणी उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (Accident)

(हेही वाचा – Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत १४ डिसेंबरपर्यंत वाढवली)

कविता सिंगाडिया (३२) आणि प्रवीण सिंगाडिया (१२) असे अपघातात मृत्यू झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. कविता सिंगाडिया या कुटुंबियांसह कुर्ला पूर्व ठक्करबाप्पा कॉलनी येथे राहण्यास होता. त्याचा मोठा मुलगा प्रवीण हा कुर्ला पूर्व नेहरू नगर येथील केदारनाथ विद्यालय येथे इयत्ता आठवीत शिकत होता. प्रवीण याची सकाळची शाळा असल्यामुळे आई कविता त्याला शाळेत स्कुटीवरून सोडविण्यासाठी जात असे. मंगळवारी सकाळी पावणे सात वाजता आई कविता आणि मुलगा प्रवीण हे दोघे ऍक्टिव्हा स्कुटीवरून शाळेत जात असताना कुर्ला स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवरील महेश लंच होम जवळ कविता यांची स्कुटी स्लिप होऊन बाजूने जाणाऱ्या डंपरच्या चाकाखाली दोघे मायलेक आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. (Accident)

(हेही वाचा – Assembly Election मध्ये ३ आमदार आठव्यांदा तर ५ आमदार सातव्यांदा विजयी; थोरातांच्या नऊ वेळा आमदार होण्याच्या रेकॉर्डला ब्रेक)

या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी डंपर चालक रिजवान नुर्र्हेमान फजूलरहेमान (३२) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. मायलेकाचं झालेल्या अपघाती मृत्यूमुळे ठक्करबाप्पा कॉलनीवर शोककळा पसरली आहे. (Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.