Accident : डंपरच्या धडकेत १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनी ठार, गोरेगाव मधील दुर्देवी घटना

114
Accident : डंपरच्या धडकेत १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनी ठार, गोरेगाव मधील दुर्देवी घटना
  • प्रतिनिधी 

वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेत निघालेल्या १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला असून तिचे वडील जखमी झाले आहे. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथे घडलेल्या घटनेप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला करून त्याला अटक करण्यात आली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Accident)

(हेही वाचा – शेतकऱ्यांना १ हजार ९२७ कोटींची भरपाई; Dhananjay Munde यांची माहिती)

विण्मयी मोरे (१३) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्देवी विद्यार्थीनीचे नाव आहे. विण्मयी ही मालाड पूर्व हायवे व्ह्यू सोसायटी कुरार व्हिलेज येथे राहण्यास होती. विण्मयी ही गोरेगाव पूर्व गोकुलधाम सोसायटी येथील सेंट झेव्हियर्स हायस्कूल मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत होती. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता विण्मयीचे वडील रमेश मोरे हे मुलगी विण्मयीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले असताना गोरेगाव पूर्व गोकुलधाम, श्री जी रेस्टॉरंट येथे भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रमेश मोरे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. (Accident)

(हेही वाचा – निराशा झटका, कामाला लागा! भाजपा नेते Amit Shah यांची सूचना)

या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेली विण्मयी ही दुचाकीवरून खाली पडली आणि तिच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. या अपघाताची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन विण्मयी आणि तिचे वडील रमेश मोरे यांना घेऊन जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात आले असता डॉक्टरांनी विण्मयीला तपासून मृत घोषित केले आणि वडील रमेश यांना उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी डंपर चालक राहुल जाधव याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.