Nashik: नाशकात अपघातांची मालिका सुरूच; दोघांचा मृत्यू

111
Nashik: नाशकात अपघातांची मालिका सुरूच; दोघांचा मृत्यू
Nashik: नाशकात अपघातांची मालिका सुरूच; दोघांचा मृत्यू

नाशिकमध्ये (Nashik) अपघाताची मालिका सुरुच आहे. शहरातील पाथर्डी शिवारात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. त्यातील एकाचा दुचाकी घसरल्याने तर दुस-याचा मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचा-Akshay Shinde Encounter: “तुडवून मारायला पाहिजे होतं”, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया!)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न भिकाजी महाजन (रा.अहिल्यानगर,पाथर्डीगाव) हे सायंकाळच्या सुमारास एमएच १८ एएच, ५३१० या दुचाकीवर वडनेरगेटकडून पाथर्डीगावाच्या दिशेने प्रवास करीत असताना हा अपघात झाला. अशोक दोंदे यांच्या गाळयासमोर पाथर्डीगावाकडून भरधाव जाणा-या मालट्रकने एमएच १२, एसएक्स ६३०० दुचाकीस धडक दिली. या अपघातात शत्रुघ्न महाजन यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत भाऊ भगवान महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गांगुर्डे करीत आहेत. (Nashik)

(हेही वाचा-Tamilnadu: हिज्ब-उत-तहरीर संघटनेच्या विरोधात एनआयएची ११ ठिकाणी छापेमारी)

दुसरा अपघात महामार्गावरील हॉटेल सेवन हेवन भागात झाला. या अपघातात सुरेश मुरहरी नागपूर्णे (वय ३१, रा.कृष्ण मंदिराजवळ चेतनानगर) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नागपुर्णे गेल्या सायंकाळच्या सुमारास एमएच १५, एचबी ९४६१ या दुचाकीवर प्रवास करीत असताना हा अपघात झाला होता. समृध्दी हॉस्पिटल समोर भरधाव दुचाकी घसरल्याने नागपुर्णे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. गुरूवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अंमलदार सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत. (Nashik)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.