Mumbai Crime : मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणातून पोलीस शिपायाची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी पोलीस शिपायाने प्रेयसीला गळफास लावलेल्या अवस्थेतील छायाचित्रे पाठवले होते.

11
Mumbai Crime : मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणातून पोलीस शिपायाची आत्महत्या
Mumbai Crime : मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणातून पोलीस शिपायाची आत्महत्या

मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणातून एका नवख्या पोलीस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वरळी पोलीस वसाहत येथे घडली. आत्महत्येपूर्वी पोलीस शिपायाने प्रेयसीला गळफास लावलेल्या अवस्थेतील छायाचित्रे पाठवले होते. (Mumbai Crime)

इंद्रजित साळुंखे असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे. दोनच वर्षांपूर्वी मुंबई पोलीस खात्यात भरती झालेल्या इंद्रजित हा वरळी पोलीस वसाहत येथे राहण्यास होता. इंद्रजित याचे गोरेगाव येथे राहणाऱ्या तरुणी सोबत प्रेमप्रकरण सुरू होते. इंद्रजित हा इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर इतर मुलीसोबत चॅट करीत असल्याचे त्याच्या प्रेयसीला आवडत नव्हते, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या विरोधात NIA ची मोठी कारवाई)

या वादातून त्याने मैत्रिणीला फोन करून आत्महत्या करीत असल्याचे त्याने मैत्रिणीला मृत्यूपूर्वी गळफास लावलेला फोटो पाठवला होता, आणि तिला कळवले की तो गळफास लावून आपले जीवन संपवणार आहे. परंतु मैत्रिणीकडून काहीच उत्तर आले नसल्यामुळे नैराश्यपोटी इंद्रजित याने घराजवळ असलेल्या लायब्ररीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित हा दुसऱ्या मुलीसोबत इन्स्टाग्रामवर चॅट करीत असल्यामुळे मैत्रीण आणि त्याच्यात भांडण झाले होते. या भांडणातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वरळी पोलिसानी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.