Fraud : ७ कोटींची मनी लॉन्ड्रिंग; नाशिकमध्ये CBI च्या नावाखाली १२ लाखांची फसवणूक

99
Fraud : पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची नऊ कोटींची फसवणूक

आरोपी विजय खन्ना याचा २८ ते ३० ऑगस्टला ७९७७३८०१९८ आणि ८३७४६१९८२७ या नंबरवरून व्हॉट्सअप कॉल येऊन त्यात आम्ही सीबीआय (CBI) मधून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे त्याने खोटे सांगितले. फिर्यादीला त्याची सर्व माहिती विचारून तुमच्या विरुद्ध कॅनरा बँकेत मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल आहे. तुम्ही नरेश गोयल यांच्यासोबत मिळून ७ कोटींची मनी लॉन्ड्रिंग केलेली आहे.

(हेही वाचा – Haryana Assembly Election : उत्तर प्रदेशच्या नेत्यांची हरियाणात ‘दंगल’)

याबाबत कोणाला काही माहिती दिली, तर तुमचे कुटुंबाला त्रास होईल, अशी खोटी धमकी देऊन घाबरून दिले. व्हॉट्सअप कॉल, स्काईप अँप व्हिडीओ कॉल करून तुम्हाला केसमध्ये मदत करू असे खोटे सांगितले. त्यासाठी त्याने भारतीय स्टेट बँक शाखा गुरगाव खाते क्रमांक ४१११०३८६४८५६ यावर १२ लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार कुटुंबाला त्रास होईल म्हणून भारतीय स्टेट बँक शाखा इगतपुरीच्या ११५४२१६६६४९ या खात्यावरून फिर्यादीने धनादेशाने १२ लाख रुपये टाकले.

(हेही वाचा – मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन, म्हणाले…)

मात्र आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे समजताच रामप्रताप रामदेव यादव, वय ७६ रा. धम्मगिरी इगतपुरी यांनी इगतपुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी फिर्यादीनुसार संशयित आरोपी विजय खन्ना, राहुल गुप्ता, रेखा मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा २००५ चे कलम ६६ (क),६६ (ड) आणि भा. न्या. स. कलम २०४,३१८(४) नुसार हा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी कसून तपास सुरु केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.