Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीच्या शरीराचे ५९ तुकडे; आरोपीची आत्महत्या, डायरीत हत्येची कबुली

महालक्ष्मीच्या हत्येचे कोडे सुटेना; १९ दिवस मृतदेह फ्रीजमध्ये

234
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीच्या शरीराचे ५९ तुकडे; आरोपीची आत्महत्या, डायरीत हत्येची कबुली
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीच्या शरीराचे ५९ तुकडे; आरोपीची आत्महत्या, डायरीत हत्येची कबुली

बंगळुरु येथील महालक्ष्मी हत्या प्रकरणातील (Mahalakshmi Murder Case) मुख्य आरोपी मुक्ती रंजन रॉय यांनी दि. २५ सप्टेंबर रोजी ओडिशातील (Odisha) भद्रक जिल्ह्यातील (Bhadrak District) भुईंपूर गावाजवळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येच्या तपासात पोलिसांना आरोपीची डायरी आणि दुचाकी सापडली. त्या डायरीत आरोपी मुक्ती रंजन रॉय (Ranjan Roy) याने महालक्ष्मीच्या हत्येची कबुली दिली आहे.

( हेही वाचा : Kolkata Doctor Rape and Murder Case : पोलिसांनी कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचे सीबीआयचा आरोप

नेमक प्रकरण काय?

महालक्ष्मी आणि रंजन (Ranjan Roy) २०२३ पासून एकमेकांपासून ओळखत होते. मल्लेश्वरमधील एका कॉस्च्युम आउटलेटमध्ये टीम लीडर म्हणून महालक्ष्मी काम करत होती. तिथेच रंजनही काम करत होता. महालक्ष्मी चार वर्षांपूर्वी आपला पती हेमंत दास यांच्यापासून विभक्त झाली होती. दि. २० सप्टेंबर रोजी २९ वर्षीय महालक्ष्मीचा मृतदेह बंगळुरूमधील व्यालिकावल भागातील बसप्पा गार्डनजवळील तीन मजली घरात सापडला. तिच्या मृतदेहाचे ५९ तुकडे करून रिफ्रिजेटरमध्ये आरोपी रंजनने ठेवले होते. त्यामुळे खोलीतून दुर्गंध येत असल्याने याप्रकरणाचा पोलिसांना छडा लागला. शेजारी राहणाऱ्या जीवन प्रकाश नामक व्यक्तीने वाढत्या दुर्गंधीमुळे महालक्ष्मीचा भाऊ उक्कम सिंग (Ukkam Singh) याला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून आता गेल्यावर खोलीत रक्ताचे डाग, महालक्ष्मीचे कापलेले डोके,पाय आणि शरीराचे ५९ तुकडे आढळले.

याप्रकरणी पोलिसांनी ६७ जणांची चौकशी केली. त्यापैकी पोलिसांनी संशयाच्या आधारे ८ जणांची कसून चौकशी केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे १९ दिवस फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपास स्पष्ट झाले आहे. मात्र महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांना अद्याप सापडलेले नाही. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र रंजनने महालक्ष्मीची हत्या का केली? हे कोडे अद्याप सुटलेले नाही. यासंदर्भात पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.