25 किलो सोने, 4 कोटींची रोकड आणि 8 लॉकर्स… ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यावर Income Tax Department चा छापा

834
राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूर येथील वाहतूक कंपन्यांवर (Transport company) आयकर विभागाने छापा (Income Tax Department Raid) टाकले आहेत. या कारवाईत मोठा खुलासा झाला असून, टिकमसिंह राव (Tikam Singh Rao) यांच्या या कंपनीवर अवैध वाहतूक केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाच्या झडती दरम्यान टिकमसिंह राव यांच्या घरातून 4 कोटी रुपयांची रोकड आणि सुमारे 18 कोटी रुपयांचे सोने सापडले. याशिवाय गोल्डन आणि लॉजिस्टिक परिवहन कार्यालयातून (Golden and Logistics Transport Office) कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची कागदपत्रेही सापडली आहेत. (Income Tax Department)
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक व्यावसायिक टिकमसिंग राव यांच्याकडून अवैध माल वाहतुकीची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी केली असता माहिती बरोबर असल्याचे आढळून आले. यानंतर 28 नोव्हेंबर रोजी आयकर पथकाने राजस्थान (Rajasthan), गुजरात आणि महाराष्ट्रात छापे टाकले.
(हेही वाचा – बाबा आढाव यांच्या समोरच Ajit Pawar म्हणाले; जनतेने दिलेला कौल मान्य केला पाहिजे )
गुजरातमधील 2 ठिकाणी, मुंबईत एक, बांसवाडा (राजस्थान) मध्ये तीन, जयपूरमध्ये एक (विश्वकर्मा औद्योगिक क्षेत्र) आणि उदयपूरमध्ये 19 ठिकाणी तपास करत आहेत. जयपूर येथील आयकर विभागाचे प्रधान संचालक अवधेश कुमार यांच्या निर्देशानुसार ही कारवाई 28 नोव्हेंबर रोजी सकाळी सुरू झाली, जी अजूनही सुरू आहे. उदयपूर, अहमदाबाद, जयपूर आणि मुंबईसह अनेक ठिकाणी कंपनीच्या 23 ठिकाणी ही कारवाई सुरू आहे.
(हेही वाचा – चिन्मय दास यांची तातडीने सुटका करावी; RSS ची बांगलादेश सरकारकडे मागणी)
गेल्या शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) उदयपूरमधील वाहतूक व्यावसायिक टिकम सिंग यांच्या १९ वेगवेगळ्या ठिकाणी झडती घेण्यात आली. यावेळी हे पथक हिरण माग्री सेक्टर-13 येथील घरात पोहोचले, तेथून 25 किलो सोने सापडले, त्याची किंमत अंदाजे 18 कोटी 34 लाख रुपये आहे. हे सोने वाहतूक व्यावसायिकाच्या दुकानात आणि व्यावसायिक जागेवर सापडले. याशिवाय येथे रोकडही सापडली आहे. झडतीदरम्यान 8 लॉकर्सचे रेकॉर्डही सापडले असून, या लॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.