पाकिस्तानच्या पोकळ धमकीला भीक न घालता Indus Water Treaty स्थगिती करण्याचा निर्णय भारताकडून कायम

215
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे दहशतवादी कारवाई केल्यानंतर भारताने तातडीने पाकिस्तानशी सर्व व्यापारी संबंध तोडले तसेच सिंधु नदी पाणी करार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळे उद्धवस्त केली. त्यानंतर 3 दिवस भारत आणि पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये भारताने पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला केल्यावर अखेर पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी भारतासमोर विनंती केली. सध्या भारताने हे स्वीकारले असले तरी सिंधु नदी पाणी करार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, 13 मे रोजी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमंद इशाक दार यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले की, जर हा करार स्थगित करण्याचा निर्णय कायम ठेवला तर तो अॅक्ट ऑफ वॉर असे समजले जाईल, असे म्हटले आहे. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानच्या या पोकळ धमकीला भीक न घालता Indus Water Treaty स्थगिती करण्याचा निर्णय कायम असल्याचे सांगितले.
भारताने पाकिस्तानच्या विरोधात शस्त्रसंधीचा निर्णय घेताना दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल, असा निर्णय घेतला. त्याच निर्णयाचा कॉपी पेस्ट केल्याप्रमाणे पाकिस्तानने हेच प्रमाण सिंदू नदी पाणी करारालाही (Indus Water Treaty) लावले. तसेच जर भारताने हा करार स्थगित करण्याचा निर्णय कायम ठेवला तर पाकिस्तान याला अॅक्ट ऑफ वॉर असे समजेल, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महंमद इशाक दार यांनी दिली. सीएनएन या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले. पाकिस्तानने एकप्रकारे भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेत भारत सिंधू नदी पाणी करार (Indus Water Treaty)  तोपर्यंत स्थगित ठेवेल जोपर्यंत पाकिस्तान खात्रीशीर आणि ठामपणे सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करत नाही, असे म्हणत पाकिस्तानच्या पोकळ धमकीला भीक घातली नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.